अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो.
शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया मंदावते.
झोपेतून अचानकपणे ताडकन उठून उभे राहिल्यास काही सेकंदांसाठी मेंदू आणि हृदयापर्यंत होणारा रक्त प्रवाह थांबतो.
यामुळे चक्क येणं, बेशुद्ध पडणं तसेच हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो.
हिवाळ्यात शरीराचं तापमान योग्य राखण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे रक्तदाब वाढतो, रक्त घट्ट होतं ज्यामुळे हृदयाला पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते ज्यामुळे हृदयावर ताण येतो.
रात्री झोपेत असताना हृदयाची गती कमी झालेली असते. अशावेळी झोपेतून अचानकपणे उठून उभे राहील्यास रक्त त्वरित मेंदूपर्यंत पोहोचत नाही.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठो डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)