फ्रिजमधील पाणी बेचव का लागतं?

Sayali Patil
Apr 29,2025

विचित्र चव

बऱ्याचजणांच्या फ्रिजमधील पाण्याला एक विचित्र चव लागते. पण, असं नेमकं का होतं? याचा विचार कधी केला आहे का?

अर्धवट बाटल्या

फ्रिजमध्ये कधीच अर्धवट बाटल्या ठेवू नये. बाटली अर्धी झाल्यास त्यात पुन्हा पाणी भरून ठेवावं.

वॉटर डिस्पेंसर

प्लास्टीकच्या, निकृष्ट दर्जाच्या बाटल्यांमुळेही पाण्याची चव विचित्र लागते. ज्या फ्रिजमध्ये इनबिल्ड वॉटर डिस्पेंसर असतं त्याचा फिल्टर वेळोवेळी न बदलल्यास पाणी बेचव लागतं.

पदार्थ

अनेकदा फ्रिजमध्ये काही पदार्थ झाकण न लावता ठेवल्यास त्याचा वास पाण्यामध्ये जाणवू लागतो आणि पाण्याची चव बिघडते.

उग्र वास

फ्रिजमध्ये लसूण , पपई, टरबूज, कांदा असे पदार्थ ठेवल्यानं त्यांचा उग्र वास पाण्यात जाणवू लागतो आणि पाणी बेचव लागतं.

फ्रिजमधील पाणी

फ्रिजमध्ये पाणी कायम काचेच्या किंवा स्टीलच्या बाटलीतच ठेवण्याता सल्ला दिला जातो. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story