लग्नाआधी हळद लावण्याची परंपरा संपूर्ण भारतात पाळली जाते
हल्ली हळदी कार्यक्रमाला इव्हेंटचे स्वरुप आले आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात हळदी समारंभ साजरा करतात
पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की लग्नाआधी वधू-वरांना हळद का लावली जाते?
हळद हे शुभ कार्याचे प्रतिक मानले जाते. पिवळा रंग नवीन सुरुवात आणि आनंदाचे प्रतीक आहे.
हळदीचा विधी केल्याने लग्नातील नकारात्मक उर्जा दूर होते आणि सकारात्मकता पसरते.
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेसाठी चांगले असतात
हळदीत करक्यूमिनसारखेच अनेक तत्व आढळतात. जे शरीर आणि मानसिक स्वास्थासाठी चांगले असतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)