स्ट्रिट फूड म्हणजे रस्त्याच्या किनारी किंवा बाजारात उघड्यावर तयार केले जाणारे अन्न. हे पदार्थ ताजे, स्वस्त आणि लवकर तयार होणारे असतात.
स्ट्रिट फूड हे केवळ चविष्टच नाही, तर ते स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा एक महत्त्वाचा भाग आहे.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, लखनऊ आणि इतर शहरांमध्ये स्ट्रिट फूडची चव वेगळी असते.
पाणी पुरी, चाट, समोसा चाट, पापडी चाट, भेळ पुरी, दही पुरी, पावभाजी, वडा पाव असे अनेक स्ट्रिट फूड येथे उपलब्ध असतात आणि ते खूप चविष्ट असतात.
काही काळापूर्वी शेफ रणवीर ब्रार एका पॉडकास्ट शोमध्ये आला होता.
शोमध्ये त्याला विचारले की हॉटेलपेक्षा स्ट्रिट फूड जास्त चविष्ट का असते?
त्यावर रणवीरने सांगितले, 'रस्त्यांवरील गाड्यांवर फ्रिज असतो का?'
तिथे फ्रिज नसल्याने ताजे अन्न बनते आणि ताजे विकले जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन सामान आणून ताजे पदार्थ तयार केले जाते.
मात्र, हॉटेलमध्ये असे होत नाही. तिथे मोठे-मोठे फ्रिज असतात. ते लोक आज तयार करतात आणि आठवडाभर तेच खायला घालतात. त्यामुळे ते अन्न जास्त चविष्ट नसते.