मच्छर 'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनाच का चावतात?

Diksha Patil
May 16,2025


रात्री आपण झोपलेलो असताना कानाजवळ येऊन मच्छर जेव्हा भूनभून करतात तेव्हा सगळ्यांनाच राग येतो.


एकीकडे तुम्हाला मच्छर झोपू देत नाही आणि दुसरीकडे तुमच्या शेजारी दुसरी व्यक्ती आरामात झोपते.


त्यामुळे मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे की आपल्यालाच मच्छर का चावत आहेत.


काही लोकांना मच्छर फार चावतात तर काही लोकांच्या आजुबाजूला मच्छर फिरकत देखील नाही.


प्रत्येक व्यक्तीची बॉडी ही वेगळी स्मेल करते. काही लोकांचं शरीर हे मच्छरांना आकर्षित करू शकत नाही.


मच्छरांना सगळ्यात जास्त O ब्लड ग्रुपचे लोकं आवडतात आणि सगळ्यात कमी A ब्लड ग्रुपचे लोकं.


घाम आणि शरिराच्या तापमानात असलेलं लॅक्टिक अ‍ॅसिड आणि गरम बॉडीकडे आकर्षित करतात.


कपड्यांमध्ये रंग पाहता मच्छरांना गडद रंग खूप आवडतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story