केसर हा सर्वात महाग मसाल्याच्या पदार्थांपैकी एक आहे.
औषधीय गुणधर्मांमुळे केसर सर्वांनाच माहित आहे. पण हेच केसर इतकं महाग का विकलं जात? असा प्रश्न अनेकांना पडतो.
एक पौंड (0.453 kg) केसर जमा करण्यासाठी तब्बल ७५ हजार फुलांचे पुंकेसर काढावे लागते.
केसरच्या फुलापासून केसर तयार केलं जातं.
केसरचे फूल अतिशय नाजूक आणि मनमोहक दिसतं. म्हणून केसर हे सर्वात महाग असते.
सध्या केसरची किंमत बाजारात तीन ते साडे तीन लाख प्रति किलो इतकी आहे.
बाजारात हिमालयीन केसर, अमेरिकन केसर, अफगाण केसर, चायना केसर यासारख्या अनेक जातीचे केसर पाहायला मिळते. यातील हिमालयीन केसर हे सर्वोत्तम मानले जाते.
केसर आरोग्यासाठी फारच उत्तम आहे. प्राचीन काळापासून सौदर्य उत्पादनांमध्ये केसरचा वापर केला जातो.
केसर हा एक उष्ण गुणधर्माचा पदार्थ आहे. त्यामुळे केसरचा वापर नेहमी चिमूटभर केला जातो.