स्कुल बस पिवळ्या रंगाच्याच का असतात?


शाळा म्हंटलं की आपल्याला शाळेची पिवळी बस डोळ्यांसमोर येते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? स्कुल बस नेहमी पिवळ्या रंगाचीच का असते? चला जाणून घेऊया.


अमेरिकामध्ये या पिवळ्या बस वापरायला प्रथम सुरूवात झाली. 1930 मध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या शिक्षकांनी इंजिनिएयर्स, ट्रान्सपोर्ट ऑफिसर्ससोबत आणि कायदेव्यवस्थापकांसोबत चर्चा केली आणि त्यांनी पिवळ्या रंगाची निवड केली.


पिवळा रंग हा Visibility Spectrum मध्ये सर्वात टॉपला असतो. हा रंग चमकणारा असल्याने तो आपल्याला दूरूनही दिसतो.


अंधारात किंवा खराब वातावरणात इतर वाहन चालकांना हा रंग पटकन दिसू शकतो. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे महत्त्वाचे आहे.


पिवाळा रंग चेतावणाचा रंग म्हणूनही वापरला जातो. त्यामुळे हा रंग इतर वाहन चालकांना ही बस लहान मुलांची असून सावधानता बाळगा असा इशारा देतो.


पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतिक आहे आणि स्कुल बसही मुलांसाठी आनंदाचे कारण असते. तिथे ते आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत मज्जा-मस्ती करतात.


अनेक देशांमध्ये स्कुल बससाठी पिवळा रंग बंधन कारक आहे. त्यामुळे सगळ्या बस एक सारख्या दिसतात आणि ओळखायला सोप्या जातात.


सुप्रीम कोर्टानेही स्कुल बसचा रंग पिवळा असणे, वाहनाच्या चारी बाजूला 150 मिमीची हिरव्या रंगाची पट्टी असणे आणि स्कुल बस असे नाव लिहिलेले असणे बंधनकारक केले आहे.

VIEW ALL

Read Next Story