स्त्रिया कपाळावर कुंकू टिकली का लावतात?

हिंदू धर्माशी संबंधित अनेक परंपरा आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रृंगार. शास्त्रामध्ये विवाहित स्त्रियांच्या श्रृंगाराचं धार्मिक कारण आणि त्याचं महत्व देखील सांगीतलं आहे.

टिकली किंवा कुंकू हे सोळा श्रृंगारापैकी एक आहे. जो भारतीय हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

कपाळाच्या मध्यभागी पाइनल ग्रंथी असते. टिकली लावताना त्याभागावर प्रेशर आल्याने ही ग्रंथी वेगाने काम करते. यामुळे मन शांत रहातं आणि कामात एकाग्रता वाढते.

कपाळावर टिकली लावण्यासाठी एक विशिष्ट पॉईंट आहे. एक्यूप्रेशरच्या तत्त्वांनुसार हा पॉइंट डोकेदुखीपासून आराम देतो. येथे टिकली लावल्याने नसा आणि रक्तवाहिन्यांचे अभिसरण होते.

शिरोधरा पद्धतीनुसार कपाळाच्या या पॉईंटवर दाब दिल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते.

टिकली लावल्याने सायनससारख्या समस्यांवरही फायदा होतो. कारण या पॉईंटचा नाकाच्या मार्गाशी थेट संबंध आहे. टिकली लावताना दाब आल्यास म्यूकस बाहेर पडणे सोपे होते.

टिकली दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लावली जाते शरीरातील सर्व नसा त्याच पॉईंटवर एकत्र येतात.

ज्या ठिकाणी टिकली लावली जाते, त्या जागेला अग्नि चक्र या नावाने सुद्धा ओळखले जाते.

VIEW ALL

Read Next Story