निखिल कामथ हा झिरोधाचा फाऊंडर असला तरी भाड्याच्या घरात राहतो. त्याचं स्वत: घर नाही.
निखिल हा बंगळुरुमध्ये एका भाड्याच्या घरात राहतो. तो प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याच्या विरोधात आहे.
निखिलचं म्हणणं आहे की सध्या रियल इस्टेटची किंमत खूप जास्त वाढली आहे. त्याशिवाय घर घेताना लागणारं व्याजही खूप जास्त आहे.
निखिलचं म्हणणं आहे की घर घेऊन नको ती गुंतवणूक करण्यात काही अर्थ नाही. कारण त्यातून चांगले रिटर्न मिळत नाही.
निखिलचं म्हणणं आहे की घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणं हे स्वस्त पडतं.
2010 मध्ये निखिलनं झिरोधाची सुरुवात केली होती आणि वयाच्या 34 व्या वर्षी तो कोट्यावधी संपत्तीचा मालक झाला.
निखिल कामथची कम्बाइंजड संपत्ती ही 5.5 अरब डॉलर्स म्हणजेच त्याची नेटवर्थ ही 45754 कोटी आहे.