कितीही खास असुदे, कामाच्या ठिकाणी 'या' गोष्टी कोणाला सांगू नका

ऑफिसमध्ये तुमचे खास मित्र बनतात. पण काही गोष्टी अशा असतात, ज्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत शेअर करायच्या नसतात.

तुमच्या पर्सनल रिलेशनशीपबद्दल ऑफिसमध्ये कोणाला सांगू नका. अन्यथा भविष्यात तुम्हाला याबद्दल पश्चाताप होऊ शकतो.

तुमच्या आजाराबद्दल सांगू नका. कोणी तुमची खिल्ली उडवू शकतं. किंवा तुम्हाला आजारी म्हणून पाहिलं जाऊ शकतं.

आर्थिक गुंतवणूक किंवा व्यवहार ऑफिसमध्ये डिस्कस करत राहू नका. तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुमची राजकीय आणि धार्मिक मते ऑफिसमध्ये जाहीरपणे सांगू नका. यातून वाद होण्याची शक्यता असते.

तुमचे करिअर प्लान्स ऑफिसमध्ये कोणाला सांगू नका. यामुळे तुमचे स्पर्धक वाढू शकतात.

कामाच्या ठिकाणी अडचणी सर्वांनाच असतात. पण त्या तुमच्या कलिगना सांगू नका. तुमच्या विरोधात याचा वापर होऊ शकतो.

तुमच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हीटीबद्दल ऑफिसमध्ये चर्चा करत बसू नका.

तुमच्या आयुष्यातील स्ट्रगल किंवा कमतरता ऑफिसच्या कलिग्जना सांगू नका.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story