World Tourism Day: कोणत्या देशाला भारतीय सर्वात जास्त भेट देतात?

जागतिक पर्यटन दिन

जागतिक पर्यटन दिन दर २७ सप्टेंबरला जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना पर्यटनाचे महत्त्व सांगणे हा आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे भारतीय सर्वात जास्त भेट देतात.

स्वित्झर्लंड

जगातील सर्वोत्तम देशांच्या क्रमवारीत स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे आणि जगातील सर्वात सुंदर देश आहे. हा देश न्यू जर्सीच्या आकाराचा आहे.

श्रीलंका

श्रीलंका हा देश दक्षिण आशियातील हिंद महासागराच्या उत्तरेकडील एका बेटावरील एक अतिशय सुंदर देश आहे. श्रीलंकेत, १ भारतीय रुपयाचे मूल्य ३.७५ श्रीलंकन ​​रुपये आहे. तिथलं निसर्गसौंदर्य बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

नेपाळ

भारताच्या बाजूचा देश म्हणजे नेपाळ. या देशात भारतीय व्हिजाशिवाय प्रवास करू शकता. तिथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. तिथे १ भारतीय रुपयाचे मूल्य १.६० नेपाळी रुपया इतके आहे.

कंबोडिया

भारतीयांच्या खिशाला परवडतील अशा देशात कंबोडिया हा देशही आहे. या देशात भारतीय १ रुपयाचे मूल्य ५० कंबोडियन रियाल आहे. या कारणामुळे भारतीय या देशाला पसंती देतात. कंबोडियामध्ये तुम्हाला प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील.

इंडोनेशिया

बीचेस आवडणाऱ्या लोकांसाठी इंडोनेशिया हा देश पसंतीस उतरतो. तिथे १ भारतीय रुपयाचे मूल्य अंदाजे १८० इंडोनेशियन रुपिया आहे.

VIEW ALL

Read Next Story