गुगल पे ॲपद्वारे ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. गुगलने हे ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकांशी चांगले संबंध आणि व्यवसाय प्रस्थापित करण्यासाठी हे ॲप लाँच करण्यात आले. याच्या मदतीने खरेदीच्या हिस्ट्रीची माहिती मिळू शकते.

मात्र आता अमेरिकेतील जुने गुगल पे ॲप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे आता त्याचे जुने व्हर्जन अमेरिकेत चालणार नाही.

4 जूनपासून अमेरिकेसमध्ये Google Pay ॲप बंद होणार आहे. त्यामुळे यानंतर, Android फोनच्या होमस्क्रीनवर दिसणारे Google Pay ॲप यापुढे दिसणार नाही.

अमेरिकेतील गुगल पे युजर्सना Google Wallet ॲपवर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त युजर्स यासाठी वेबसाइटचीही मदत घेऊ शकतात. गुगलचे म्हणणे आहे की ते आपल्या युजर्संना वेळोवेळी अपडेट्स देत राहील.

मात्र, भारत आणि सिंगापूरच्या युजर्सना याची काळजी करण्याची गरज नाही. कारण GPay दोन्ही ठिकाणी पूर्णपणे काम करत राहील.

VIEW ALL

Read Next Story