मिसळ पाव

10 best Maharashtrian dishes : मिसळ पाव. हा अनेकांच्याच आवडीचा पदार्थ. नाशिकची, पुण्याची, मुंबईची अशी विविध ठिकाणांनुसार मिसळीची चवही बदलते. त्यामुळं 'मिसळ इज मस्ट'.

Aug 05,2023

कोथिंबीर वडी

बेसन, मसाले आणि कोथिंबीर यांचं मिश्रण एकजीव करत तयार करण्यात आलेला हा खमंग पदार्थ. शेंगदाणे, तीळ आणि राईचे दाणे याची चव आणखी वाढवतात.

पिठलं भाकरी

अगदी सोपं, सकस असं अन्न. डाळींचं पीठ, त्याला मिरची- कढीपत्त्याची खमंग फोडणी आणि सोबतीला टम्म फुगलेली भाकरी. आणि काय हवं?

कोल्हापुरी चिकन

लालभडक तर्री आणि सोबतीला जबरदजस्त चवीचं चिकन. असा कमाल बेत म्हणजे कोल्हापुरी चिकन.

बासुंदी

महाराष्ट्राच्या घराघरात बनणारा हा पदार्थ. साखर, वेलचीपूड, सुका मेवा यांची दुधाशी सुरेख सांगड घालत तो तयार केला जातो.

सोलकढी

कोकम, नारळाचं दूध, मिरची आणि कोथिंबीर या पदार्थांचं सुरेख आणि कमाल पेय म्हणजे सोलकढी.

आमटी

महाराष्ट्रात आमटी ही प्रांतानुसार बदलते आणि तिची चवही. पण, आमटीवरचं प्रेम मात्र कायम तितकंच... अमाप.

पुरण पोळी

गोड पराठा म्हटलं तरी चालेल. डाळीचं पीठ, गोडवा वाढवायला गुळ. पिठाच्या आवरणात हे मिश्रण मिसळून, त्याची पोळी लाटून खरपूस भाजून घ्यायची आणि तुपाची धार सोडून तिच्यावर ताव मारावा.

थालीपीठ

मिश्रडाळींचं पीठ, त्यामध्ये चवीला कांदा, मिरची किंवा आवडीची भाजी मिसळून त्याचं थालीपीठ थापून खरपूस भाजावं. थालीपीठ हा अनेकांसाठी आवडीचा पदार्थ.

VIEW ALL

Read Next Story