दिंडीमध्ये खास पाहुणे

वारी संप्रदायात संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणत देत निसर्गाचं रक्षण करा, वृक्ष लावा, प्राण्यांचे रक्षण करा असा संदेश दिला असून हाच संदेश अधोरेखित करण्यासाठी खास पाहुणे यंदा दिंडीत सहभागी झाले आहेत.

user Swapnil Ghangale
user Jun 21,2023

कोण आहेत हे खास पाहुणे?

या खास व्यक्ती आहेत सातारा आणि कराड वनविभागाचे अधिकारी. अगदी महिला कर्मचाऱ्यांपासून पुरुष कर्मचारीही या दिंडीमध्ये सहभागी झाले.

पंढरपूरपर्यंत जाणार

सातारा आणि कराड वनविभागाचे हे अधिकारी आणि निवडक कर्मचारी वृक्षदिंडी घेऊन पंढरपूरपर्यंत जाणार आहेत हे विशेष.

विशेष संदेश देत वाटचाल

या वृक्षदिंडीच्या माध्यमातून निसर्ग जोपासा, वाघाची शिकार करू नका वनपरिक्षेत्राचे नियम आणि कायदे समजून घ्या, असा संदेश देत वाटचाल करत आहे.

टाळ मृदुंगाच्या तालावर फुगड्या

या दिंडीच्या निमित्ताने वनपरिक्षेत्रात कायम तैनात असणारे खाकी वर्दीतले वन अधिकारी टाळ मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळताना दिसले.

जनसामान्यांमध्ये मिसळण्याचा उपक्रम

हरिनामाचा गजर करत जनसामान्यांमध्ये मिसळण्याचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा हा उपक्रम आहे.

VIEW ALL

Read Next Story