अशोक सराफ तुमचा सख्खा मामा आहे का? टोपण नावावरून भडकले राज ठाकरे

Diksha Patil
Jan 07,2024

नाटकांची आवड

'सुरुवाती पासूनच मला नाटकांची आवड होती. नाटकामध्ये रीटेक नसतात, आम्हाला भाषण करताना ही रिटेक नसतो...! सकाळी बघितल्यावर लक्षात येते जरा रिटेक घ्यायला पाहिजे.'

कलाकारांनी करावा एकमेकांचा आदर

राज ठाकरे म्हणाले की 'कलाकारांनी एकमेकांचा आदर करायला हवा. लोकांसमोर तुम्ही एकमेकांना टोपण नावानं हाका मारतात. लोकांपुढे एकमेकांना आदर द्या, तो तुम्ही देत नसाल तर लोक तुम्हाला मान का देतील...!'

मैत्री चार भिंतीत असावी

जाहीर कार्यक्रमात स्टेजवर प्रेक्षकांसमोर मराठी कलाकार एकमेकांना एकेरी नावाने बोलवतात. तुमची मैत्री चार भिंतीत असली पाहिजे. चार चौघात कलाकारांनी एकमेकांन मान दिलाच पाहिजे असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.

दाक्षिणात्य कलाकारांचं उदाहरण

दाक्षिणात्य कलाकारांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, 'तिथे रजनीकांत, इलाईराजा रात्री एकत्र दारू पितील, पण लोकांमध्ये ते एकमेकांचा आदर करतात. सर म्हणून बोलतात.'

अशोक सराफांचा उल्लेख

आदर देण्याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'अशोक सराफ आले तर मी त्यांना सर म्हणेल, त्यांना मामा म्हणतात , तुमचा सख्खा मामा आहे का? त्यांना सरच म्हणायला पाहिजे.'

मराठी कलाकारांनी काय टाळावं?

'सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकेरी भाषेत बोलणे मराठी कलाकारांनी टाळले पाहिजे', असं राज ठाकरे पुढे म्हणाले.

राजकीय भाषेत उदाहरण

'राजकीय भाषेत सांगायचं झालं तर या स्टेजवर जर शरद पवार आले तर मी त्यांना पाया पडेल, राजकीय भूमिका स्टेज वर....! तुम्ही एकमेकांचा आदर राखला पाहिजे...!', असं राज ठाकरे म्हणाले. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story