महाराष्ट्राला लाभलेत 20 CM पण दोघांनीच पूर्ण केला 5 वर्षांचा कार्यकाळ; दुसऱ्याच्या नावे 1 नकोसा विक्रम

Swapnil Ghangale
Oct 22,2024

राज्याला लाभलेत 20 मुख्यमंत्री

महाराष्ट्रात आतापर्यंत 20 नेते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.

20 मुख्यमंत्र्यांपैकी केवळ...

मात्र या 20 मुख्यमंत्र्यांपैकी केवळ दोघांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे.

केवळ 10 टक्के मुख्यमंत्री

म्हणजेच कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची टक्केवारी केवळ 10 इतकी आहे.

कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री...

आपला कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक!

11 वर्ष मुख्यमंत्री

वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते. ते तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्री होते.

कोणत्या कालावधीत मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक?

वसंतराव नाईक यांनी 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 दरम्यान राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवलं.

असा पराक्रम करणारा दुसरा मुख्यमंत्री...

वसंतराव नाईकानंतर थेट 39 वर्षांनी महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री लाभला.

युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री

फडणवीस हे 2014 ते 2019 दरम्यान पाच वर्ष युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री राहिले.

शपथ केवळ अडीच दिवस टिकली

मात्र 2019 मध्ये त्यांनी अजित पवारांबरोबर पहाटेच्या शपथविधीमध्ये घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ केवळ अडीच दिवस टिकली.

नकोसा विक्रमही

अडीच दिवसांच्या मुख्यमंत्रीपदामुळे सर्वात कमी वेळ मुख्यमंत्री राहण्याचा नकोसा विक्रमही फडणवीसांच्या नावावर झाला.

VIEW ALL

Read Next Story