भाऊबीजेच्या दिवशी भेट म्हणून 'या' वस्तू अजिबात भेट देऊ नयेत

Published by: Pooja Pawar | Oct 22, 2025

भाऊबीजेचा दिवस हा भावा बहिणींसाठी अतिशय खास मानला जातो. यादिवशी बहीण भावाला ओवाळते, टिळा लावते आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात.

Published by: Pooja Pawar | Oct 22, 2025

मात्र भाऊबीजेला भेटवस्तू देताना भावा बहिणींनी कोणती काळजी घ्यावी तसेच कोणत्या वस्तू भेट म्हणून देऊ नये याबद्दल जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Oct 22, 2025

काळ्या रंगाचे कपडे :

भाऊबीजेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे भेट म्हणून देणे टाळावे. शास्त्रात सणांच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत किंवा भेट देऊ नयेत असं वाटतं.

Published by: Pooja Pawar | Oct 22, 2025

टोकदार वस्तू :

भाऊबीजेच्या दिवशी टोकदार तीक्ष्ण वस्तू भेट म्हणून देणं टाळावं. कारण या वस्तुंमुळे नात्यात दुरावा येतो असं म्हंटल जातं.

Published by: Pooja Pawar | Oct 22, 2025

रोख रक्कम :

भाऊबीजेच्या दिवशी अनेकजण भावा बहिणींना ओवाळणीत पैसे देतात. पण हे चुकीचं आहे असं तज्ज्ञ म्हणतात. भेटवस्तू म्हणून पैसे दिल्याने भावा बहिणीच्या नात्यात दुरावा वाढतो.

Published by: Pooja Pawar | Oct 22, 2025

घड्याळ :

भाऊबीजेच्या दिवशी घड्याळ भेट म्हणून देणं टाळावं. कारण घड्याळ हे काळाचं प्रतीक आहे, भेट म्हणून घड्याळ दिल्यास तुमच्यासाठी वाईट काळ सुरु होतो असं म्हणतात.

Published by: Pooja Pawar | Oct 22, 2025

चप्पल :

शूज आणि चप्पल भेट म्हणून देणं अशुभ मानलं जातं. शूज आणि चप्पल भेट दिल्याने घरातील शांती आणि आनंद बिघडते.

Published by: Pooja Pawar | Oct 22, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Pooja Pawar | Oct 22, 2025

VIEW ALL

Read Next Story