महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत. त्यापैकीच एक सोलापूर येथील हरिहरेश्वर मंदिर.
सोलापूरपासून 30 किलोमीटरवर भीमा व सीना नदीवरील संगमाजवळ हे अनोखे शिवमंदिर आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेजवळील कुडल संगम गावात असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
1996 मध्ये सोलापूरच्या एका महाविद्यालयीन प्राध्यापकाला उत्खनाना दरम्यान हरिहरेश्वर या शिवमंदिराच्या भूकुशीतून हे शिवलिंग सापडले.
11 व्या शतकातील हे शिवलिंग चार मीटर परिघाचे आणि मध्यभागी 117 मीटर उंचीचे आहे. याचे वजन 4.5 टन इतके आहे.
या शिवलिंगावर नऊ ओळींमधून उठून दिसणार्या 365 शिवमुद्रा कोरलेल्या आहेत.
विशेष म्हणजे प्रत्येक शिवमुद्रेच्या चेहऱ्यावरील हावभाव हे वेगळे आहेत. वैत्रानिक दृष्ट्या वर्षातील 365 दिवसांचे हे हावभाव आहेत.
हरिहरेश्वर मंदिर हे एकमेव मंदिर आहे जिथे शंकर आणि विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते.
या मंदिराची रचना, मुखमंडप, सभामंडप, दगडी प्रवेशद्वार पाहिले असता प्राचीन काळातील दिव्य शिववैभव संपन्नतेची छपा पहायला मिळते.