चंद्रपूरपासून साधारण 7 तासांच्या अंतरावर असणाऱ्या एका गिरीस्थानानं कायमच इथं येणाऱ्या प्रत्येकाला थक्क केलं आहे.
इतकं, की इथं आल्यानंतर हे ठिकाण तर काश्मीरलाही टक्कर देतंय असंच काहीजण म्हणाले.
चंद्रपूरनजीक असणारं आणि विदर्भातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारं हे गिरीस्थान कोणतं तुम्हाला माहितीये?
महाराष्ट्रात असणाऱ्या या हिलस्टेशनचं नाव आहे चिखलदरा. चंद्रपूरपासून 322 किमी अंतरावर असणारं हे ठिकाण इथून 7 तासांच्या अंतरावर आहे.
भारतातील सर्वात सुंदर गिरीस्थानांपैकी एक असणारं हे ठिकाण इथल्या उंच डोंगररारांगासोबत नजर रोखून धरणाऱ्या सुरेख निसर्गासाठी ओळखलं जातं.
ट्रेकिंग, अॅडवेंचर अशा विविध साहसी खेळांचा आनंद इथं येून घेता येतो. उन्हाळी दिवसांमध्ये इथं पर्यटकांचा ओघ आपोआपच वाढतो.