Hill Stations in Maharashtra: उन्हाच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्रातच करा 'या' ठिकाणांची भटकंती

Sayali Patil
Apr 03,2025

तोरणमाळ

सातपुडा पर्वतरांगांमध्ये साधारण 1143 मीटर इतक्या उंचीवर असणारं हे आणखी एक थंड हवेचं ठिकाण.

ताडोबा

उन्हाळ्यात हा पर्याय अर्थात ताडोबाला जाणं काहीसं जोखमीचं वाटतच असलं तरीही व्याघ्रदर्शनासाठी हाच एक उत्तम वेळ समजला जातो.

ताडोबा

उन्हाळ्यात हा पर्याय अर्थात ताडोबाला जाणं काहीसं जोखमीचं वाटतच असलं तरीही व्याघ्रदर्शनासाठी हाच एक उत्तम वेळ समजला जातो.

पाचगणी

पाच डोंगरांवर वसलेलं ठिकाण म्हणून पाचगणी असं या ठिकाणाचं नाव असून हे ठिकाण महाबळेश्वरपासून 20 किमी अंतरावर आहे.

माथेरान

कर्जतमध्ये पश्चिम घाटात 800 मीटर उंचीवर असणाऱ्या या ठिकाणी असणारी घनदाट वनराई खूप खास.

महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 4500 फूट इतक्या उंचीवर असल्यामुळं इथल्या हवेत कायमच सुरेख गारवा असतो.

कोयनानगर

साताऱ्यातील कोयनानगर परिसरामध्ये असणारी वनराई आणि निसर्गसौंदर्य पाहण्याची पर्वणी इथं तुम्हाला मिळू शकते.

जव्हार

ठाणे जिल्ह्यातील हे एक सुरेख ठिकाण. ठराविक उंचीवर स्थिरावल्यामुळं येथील हवेत थंडावा जाणवतो.

चिखलदरा

सातपुडा पर्वतरांगांमधील आणखी एक थंड हवेचं ठिकाण म्हणजे चिखलदरा. विदर्भातील हे एक कमाल गिरीस्थान.

VIEW ALL

Read Next Story