भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जियो हॉटस्टारसोबत मिळून 5 भागांची डॉक्यूमेंट्री केली आहे.
आरबीआयचं काम कसं चालतं?सोनं, पैसा कसा ठेवला जातो? हे दाखवण्यात आलंय.
या डॉक्यूमेंट्रीमध्ये एका खास ट्रेनचा उल्लेख करण्यात आलाय. भारतातील अशी ट्रेन जी चालते तेव्हा डब्यांमध्ये नोटांचे बॉक्स असतात.
या ट्रेनला ट्रेजरी ट्रेन किंवा स्पेशल करन्सी ट्रेनदेखील म्हटले जाते. आरबीआयने नोटा छापल्यानंतर या ट्रेनच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात पाठवल्या जातात.
ही नेहमीची ट्रेन नसून एक विशेष ट्रेन आहे. ज्याचा उपयोग नोटा एका शहरातून दुसऱ्या शहरात सुरक्षितपणे नेण्यासाठी होतो.
आरबीआय वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या आपल्या कार्यालयात कॅश पाठवण्यासाठी याची मदत घेते.
या ट्रेनमध्ये कडेकोट सुरक्षा, सशस्त्र गार्ड, पोलीस, अर्धसैनिक दल तैनात असते.
ही ट्रेन केवळ आरबीआय आणि संबंधित सरकारी एजन्सीसाठी असते. यात सामान्य प्रवासी प्रवास करु शकत नाहीत.
2016 मध्ये या ट्रेनमध्ये मोठी चोरी झाली होती. तेव्हा ट्रेनचे छत कापून 5.78 कोटी लंपास करण्यात आले होते.
कॅशची देखरेख करण्याची जबाबदारी सलेम पोली आणि 9 सदस्यीय टीम आणि डीएसपीला देण्यात आली होती. ते शेजारच्या कोचमध्ये होते पण त्यांना चोरीबद्दल कळालेच नाही.
ट्रेनमधून 340 कोटी रुपयांच्या जुन्या फाटक्या नोटांची कॅश 226 पेट्यांतून सलेमहून चेन्नईला पाठवण्यात येत होती.
226 पैकी 4 पेट्यांसोबत गैरप्रकार उघडकीस आला. यात 5 कोटी रुपये गायब असल्याची माहिती आयजीपी एम रामसुब्रमणि यांनी दिली.