केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तरुण पिढीला फिट रहाण्याच्या सल्ला दिला आहे. त्याचबरोबर आपल्या फिटनेसचं त्यांनी रहस्यही सांगितलं आहे.

'आजतक'च्या एका कार्यक्रमात गडकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी गेल्या वर्षात 45 किलो वजन कमी केल्याचं सांगितलं

नितीन गडकरी यांचं वजन आधी 135 किलोपर्यंत वाढलं होतं. आता ते 9० किलो झालं आहे. आता त्यांची पूर्ण जीवनशैली बदलली आहे.

जेव्हा आपण पक्षासाठी काम करत होतो, त्यावेळी माझ्या आयुष्यात कोणतंही वेळापत्रक नव्हतं. तसंच जेवणात खूप रुची होती.

पण आता आहारात शिस्तबध्दता आणली आहे. मी दोन्ही वेळी दोन चपाती खातो, थोडा भात, डाळ आणि भाजी खातो असं त्यांनी सांगितलं.

त्याचबरोबर दररोज सकाळी दीड तास व्यायाम आणि प्राणायम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्राणायामाचा खूप फायदा झाला आहे. माझ्या शरीरात इतका बदल झाला आहे याचा मला आनंद असल्याचंही ते सांगतात.

आयुष्यात तीन नियमांचं काटेकोर पालन करतो, पहिलं आरोग्य, दुसरं इमानदारी आणि तिसरं लोकांसाठी काम. आरोग्य चांगलं ठेऊन ईमानदारी वाढवा आणि लोकांसाठी काम करा असा मंत्र त्यांनी युवा पिढीला दिला आहे.

VIEW ALL

Read Next Story