छत्रपती शिवरायांच्या अस्थी आजही 'या' ठिकाणी ठेवल्यात जपून
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत.
शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच स्वराज्याचं स्वप्न पाहिलं.
शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर अखेरचा श्वास घेतला.
निधनानंतर शिवरायांच्या पार्थिवावर युवराज राजाराम राजेंनी अंत्यसंस्कार केले.
शिवरक्षा आणि अस्थी जगदीश्वर देवळाजवळ पुरण्यात आल्या.
शिवरायांच्या अस्थी आजही जपून ठेवल्या आहेत, असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही.
महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावल्यानंतर या समाधीचा जिर्णोध्दार करण्याची घोषणा केली होती.
जिर्णोद्धाराच्या प्रत्यक्ष कामाला जेव्हा सुरुवात झाली. तेव्हा शिवरायांच्या समाधी ठिकाणी खोदकाम करण्यात आलं.
तेथे खोदकाम करताना मजुरांना एका पेटीत महाराजांच्या अस्थी आणि रक्षा मिळून आल्या.
कंत्राटदार सुळे, रायगड स्मारक समितीचे सदस्य महादेव वडके आणि ज्येष्ठ लेखक गो.नी.दांडेकर यांनी छत्रपतींच्या रक्षेपैकी थोडीदार रक्षा काढून घेतली.
कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही भाग आहे.
छत्रपती शाहू महाराजांचं याबाबत पत्र आहे. तसेच अस्थी जपून ठेवल्या