मुख्यमंत्री रमले शेतात! गावच्या मातीत राबतानाचे फोटो केले शेअर

Published by: Zee Team | Jan 24, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त आले आणि बराच वेळ आपल्या शेतात रमले.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

येथे औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा , सफरचंद, अव्हॅकॅडो , अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड करण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गाव , शेती गावाकडची माणसं यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते, असे ते म्हणाले.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

माणूस गावापासून कितीही दूर गेला , कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या माती बद्दल आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते, असेही ते म्हणाले.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

सातारा जिल्ह्यात मिशन सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

बांबूला मोठी मागणी आहे. बांबू बरोबरच रेशीम, सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

कादांटी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे खोरे निसर्ग संपन्न आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

या खोऱ्यात वासोटा किल्ला, उत्तेश्वर मंदिर यासारखी विविध पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

त्यानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

VIEW ALL

Read Next Story