भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे पुढे नेत आहेत.
यंदा दसरा मेळाव्यात एक विशेष उपस्थिती आहे. गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री मुंडे या देखील उपस्थित आहेत. यशश्री मुंडे या सलग दुसऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्या आहेत.
यशश्री यांच्या उपस्थितीमुळं आता त्यासुद्धा राजकारणात एन्ट्री घेणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. त्यापूर्ण कोण आहेत यशश्री मुंडे हे जाणून घेऊया.
यशश्री मुंडे राजकीय व्यासपीठावर किंवा चळवळीत फारशा दिसत नाहीत मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांचा सहभाग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
यशश्री मुंडे या पेशाने वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट’म्हणून गौरवही करण्यात आला.
कॉर्नल विद्यापीठ जगातील पाच विद्यापीठांपैकी सर्वोत्तम विद्यापीठ आहे. या विद्यापीठात जगातील केवळ ११ टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो
पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे या दोघींचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. तर यशश्री यांनी शिक्षण इंग्रजी शाळेतून पूर्ण केले आहे.
मार्च महिन्यात वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत सहभागामुळं त्या राजकारणात एन्ट्री घेणार का? असा प्रश्न चर्चेत आला आहे.