अनेक दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.
अखेर मंगळवारी त्यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडू सुपूर्द केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे आपली संपत्ती पाच वर्षात दुपटीहून अधिक झाल्याचं शपथपत्रातून जाहीर केलं होतं.
2019 मध्ये धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती 23 कोटी रुपये इतकी होती.
तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे 53.80 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.