भारतात एकूण 28 राज्यं आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत.
भारतातील प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वेगवेगळं वेतन मिळतं.
मुख्यमंत्र्यांना किती पगार द्यावा हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक राज्याच्या सरकारला असतो. त्यानुसारच मुख्यमंत्र्यांच्या पगाराची रचना निश्चित केली जाते.
मुख्यमंत्र्यांचा पगार हा त्यांच्यावरील जबाबदारी, राज्याचा आवाका आणि काम यावर साधारणपणे अवलंबून असतो.
प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार, देशात सर्वाधिक पगार तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो.
तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना महिन्याला 4 लाख 20 हजार रुपये इतकं वेतन मिळतं.
देशातील कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या पगारापेक्षा ही रक्कम अधिक आहे.
सध्या तेलंगणचे मुख्यमंत्री काँग्रेसचे रेवंत रेड्डी हे आहेत.
सर्वाधिक पगार मिळणाऱ्या राज्यांच्या यादीत दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना 3 लाख 75 हजार रुपये प्रती महिना इतका पगार मिळतो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मासिक वेतन म्हणून महिन्याला 3 लाख 40 हजार रुपये मिळतात.