राजेंद्र हगवणे यांचे वडिल तुकाराम हगवणे हे मुळशीच्या भुकूम गावचे ख्यातनाम पैलवान होते
1980 साली ते पुणे झेडपी सदस्य म्हणून निवडून आले आणि नंतर सभापतीही बनले
2004 साली राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुळशीतून विधानसभा लढले पण पराभूत झाले
याच काळात ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ही होते, पुढे जिल्हा बँकेचं इलेक्शन लढले पण पुन्हा पडले...
शेती आणि दुधाचा मूळ व्यवसाय नंतर जमिनी व्यवहार, कंञाटंही घेऊ लागले
राजेंद्र हगवणे यांनी स्वत:च्याच वडिलांचे खोटे मृत्यूपञ बनवून सगळी मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता पण नंतर तो डाव फसला
राजेंद्र हगवणे यांना शशांक आणि सुशील ही दोन मुलं, या दोघांकडेही लायसन्स पिस्तुल असल्याची माहिती.
सुशील हगवणे हे अजित पवार गटाचे युवक तालुकाध्यक्ष होते
राजेंद्र हगवणे प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य होते पण हुंडाबळीचा गुन्हा दाखल होताच हकालपट्टी झाली
शर्यतीच्या बैलासमोर गौतमी पाटीलला नाचवल्याचा पराक्रमही याच हगवणे घराण्याचा