अनेक महिला उन्हाळा किंवा पावसाळ्यात ठंड किंवा इतर ठिकाणी फिरण्यासाठी जात असतात.
जर तुम्ही देखील हिल स्टेशनच्या ठिकाणी गेल्यावर खरेदी करत असाल तर पुढील टिप्स लक्षात ठेवा.
कधीही हिल स्टेशनवर जाताना आरामदायी शूज घालावे. अन्यथा जास्त चालल्याणे तुमच्या पायांना फोड येऊ शकतात.
तसेच हवामान कसे आहे हे पाहूनच छत्री आणि आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी प्लास्टिक सोबत ठेवा.
हिल स्टेशनवर वस्तू खरेदी करताना विक्रेते खूप जास्त किंमती सांगतात. त्यामुळे योग्य वस्तू वाटाघाटी करून खरेदी करा.
तसेच बनावट वस्तू देखील विक्रेते विकत असतात. त्यामुळे त्या देखील तुम्ही खरेदी करण्यापूर्वी तपासून पाहा.
पर्यटनस्थळी किंवा तेथील गर्दीच्या ठिकाणी चोरांपासून देखील सावध राहा. कारण अशा ठिकाणी चोरीची शक्यता जास्त असते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)