भारतात बेकादेशीररीत्या बंदूक बागळणे गुन्हा आहे. परवाना असल्याशिवाय बंदूक वापरता येत नाही.
बंदूक वापरण्याचे लायसन कुणाला आणि कसे दिले जाते याची प्रक्रिया जाणून घेऊया.
सरकारच्या नियमांनुसार शॉटगन, हँडगन आणि स्पोर्टगन या तीन प्रकारच्या बंदुकींसाठी परवाना मिळतो.
शस्त्र परवान्यासाठी ओळखीचा आणि निवासस्थानाचा पुरावा द्यावा लागतो.
मतदान ओळखपत्र, मागच्या तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न तसेच आपण कोणती गन घेणार आहोत, त्याचीही माहिती द्यावी लागते.
दोन व्यक्तींकडून चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागते.
सर्वात महत्वाचे म्हणेज बंदूक का वापरायची आहे याचे वैद्य कारण अर्जात नमूद करावे लागते.
जिल्हाधिकारी कार्यालयात बंदूक वापरण्याचा परवाण्याचा अर्ज सादर करावा लागतो.
पोलिसांमार्फत चौकशी तसेच कादपत्रांचे व्हेरिफिकेशन केले जाते. तोंडी तसेच लेखी स्वरुपात बंदूक का बाळगाची आहे याचे कारण द्यावे लागते.