मिठी वगळता एक, दोन नाही तर मुंबईत ‘इतक्या’ नद्या वाहतात; तिसरीचं नावही तुम्ही ऐकलं नसेल

Published by: Swapnil Ghangale | Jul 23, 2025

आर्थिक राजधानीचं शहर

मुंबई हे देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर आहे. हे अंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 23, 2025

समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं शहर

मुंबई शहर समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं असून दर पावसाळ्यात मिठी नदीचं नाव प्रत्येक मुंबईकर आवर्जून ऐकतो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 23, 2025

कोणत्या नद्या वाहतात

मात्र मिठी नदी वगळता मुंबईमधून कोणत्या नद्या वाहतात तुम्हाला माहितीये का?

Published by: Swapnil Ghangale | Jul 23, 2025

मिठी वगळता तीन नद्या

मिठी नदीला येणाऱ्या पुरामुळे ही नदी कायम चर्चेत असली तरी मुंबईत अजूनही तीन नद्या वाहतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 23, 2025

दहिसर नदी

ही नदी मुंबईतील बोरीवली नॅशनल पार्कमधील तुळशी तलावातून उगम पावते आणि गोराई-मनोरी खाडीला मिळते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 23, 2025

पोईसर नदी

मुंबईतल्या बोरीवली नॅशनल पार्कच्या बोरीवली बाजूच्या टोकाला हिचा उगम आहे. कांदिवली या उपनगरातून वहात वहात ती वर्सोव्याच्या खाडीला मिळते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 23, 2025

ओशिवरा नदी

ही नदी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावते आणि अंधेरीच्या औद्योगिक क्षेत्रातून वहात जात वर्सोव्याजवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीची लांबी फारच कमी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 23, 2025

VIEW ALL

Read Next Story