तुमची 1 ऑर्डर दिल्यावर Zepto-Blinkit डिलीव्हरी बॉयला किती रुपये मिळणात?

Pravin Dabholkar
Mar 21,2025


ऑनलाईन ग्रोसरी अॅपमुळे काही मिनिटांत सामान तुम्हाला घरपोच मिळते.


सामान हाती आल्यावर त्याची किंमत, डिलीव्हरी चार्ज, जीएसटी हे आपण बीलवर पाहतो. पण डिलीव्हरी बॉयला किती रुपये मिळतात? याचा विचार कधी केलाय का?


एक डिलीव्हरी बॉय दिवसाला साधरणपणे 35 ते 40 ऑर्डर घेतो.


एका किलोमीटरच्या राइडवर डिलीव्हरी बॉयच्या खात्यात 10 ते 15 रुपये येतात. अनेकदा हे पैसे जास्त असतात तर कधी कमीपण मिळतात.


तुम्ही सरासरी काढली तर एका डिलीव्हरीमागे 9 रुपये मिळतात.


ग्राहकाने 50 रुपयाची ऑर्डर करुदे अथवा 500 रुपयांची डिलीव्हरी बॉयला किलोमीटरप्रमाणेच पैसे मिळतात.


दिवसाला किती ऑर्डर डिलीव्हर करतोय, यावर त्यांची कमाई ठरलेली असते.


जितक्या जास्त ऑर्डर करणार तितकी जास्त कमाई होते.


सणासुदीला त्यांना कोणता वेगळा बोनस मिळत नाही. किंवा कोणतं गिफ्ट मिळत नाही.


पण सणासुदीला रोजच्यापेक्षा जास्त ऑर्डर असतात, त्यामुळे कमाई जास्त होते.


कंपनीकडून कोणत्या खास दिवसाला काही इन्सेन्टीव्ह किंवा बोनस नसतो, असेही डिलीव्हरी बॉय सांगतात.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story