रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ही घटना समोर आल्यापासून राज्यभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान इरसालवाडी या गावाला हे नाव कसे पडले? याचा इतिहास काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.
इर्शाळगडाच्या पायथ्याशीच हे गाव आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर उभारण्यात आला तो डोंगर विशाल किंवा इर्शाळ नावाने प्रसिद्ध आहे. स्थानिक नागरिक याला जिनखोड नावाने ओळखतात.
काहीजण याला इरसाल असे संबोधतात. या डोंगरातून किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेडीवाकडी वळणे आहेत. त्यावरुन इरसाल संबोधले जाते असे म्हटले जाते.
इरसालवाडी गावात इर्साळा देवीचं खूप जुनं मंदीर आहे. त्यावरुन गावाला ईसाळा असे म्हटले जाते. या मंदिरात आणखी दोन लहान मुर्ती आहेत. त्यावरुनच इरसालवाडी असे नाव पडल्याचे अनेकजण सांगतात.
रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात इर्शाळगड नावाचा किल्ला आहे. येथे जाण्यासाठी इरसालवाडीतून जावे लागते. या किल्ल्याला विशालगड अशा दुसऱ्या नावाने संबोधले जाते.