नववर्षात किंवा नाताळच्या सुट्टीत छोट्या सुट्टीचा प्लान आखत असाल तर मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याला निसर्गासोबतच ऐतिहासिक वारसादेखील लाभला आहे. तर, या हिवाळ्यात तुम्ही जव्हारला नक्की भेट द्या

जव्हार हे हिल स्टेशन म्हणूनही ओळखले जाते. पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वरही म्हणूनही ओळखले जाते. या पर्यटनस्थळाची माहिती जाणून घेऊया.

जव्हार तालुक्यातील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे जव्हारचा राजवाडा. हा वाडा राजबरी व जयविलास राजवाडा म्हणूनही ओळखला जातो.

आदिवासी संस्कृती दर्शवणारे कोरीवकाम, राजवाड्याची घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत

सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा राजवाडा पाहण्यासाठी खुला असतो. राजवाडा आतून पाहण्यासाठी माफक प्रवेश फी आकारली जाते.

दाभोसा धबधबा हादेखील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हा बारामाही धबधबा असून सुमारे ३०० फूट उंचीचा आहे. मुंबईपासून अवघ्या 150 किमी अंतरावर आहे.

भूपतगड, कोपरा धबधबा, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा इत्यादी स्थळे पाहता येतील

VIEW ALL

Read Next Story