लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती मंडळ आहे.
'लालबागचा राजा' हा गणपती नवसाला पावणारा असल्याने दरवर्षी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.
तेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येण्यापूर्वी मंडळाने दिलेलं वेळापत्रक, दर्शनाची वेळ, आरतीची वेळ इत्यादी माहिती करून घ्या अन्यथा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.
लालबागच्या राजाच्या सामान्य दर्शन हे सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरु असणार आहे
पुढील 10 दिवस लालबागच्या राज्याचं चरण स्पर्श दर्शन हे सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
लालबागच्या राज्याचं मुख दर्शन हे सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार.
दहा दिवस लालबागच्या राज्याचं लाईव्ह दर्शन 24 तास सुरु राहणार आहे. लाईव्ह दर्शन तुम्ही युट्युबच्या माध्यमातून पाहू शकता.