राज ठाकरे NDA मध्ये गेल्यास BJP चा काय फायदा? 4 मुद्द्यांमध्ये समजून घ्या

एक किंवा दोन जागांची मागणी

भाजप आणि एनडीएमध्ये हातमिळवणी झाल्यास मनसेकडून लोकसभा निवडणुकीसाठी एक किंवा दोन जागांची मागणी केली जाणार आहे.

फायदा काय?

प्रामुख्यानं मनसेची नजर दक्षिण मुंबईतील आणि शिर्डी मतदारसंघावर असणार आहे. पण या युतीचा भाजपला नेमका फायदा काय?

शिंदे गटाची कोंडी?

येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच संपूर्ण गटाची कोंडी व्हायची परिस्थिती निर्माण झाल्यास 'ठाकरे' हे नाव आपल्यासोबत ठेवत मराठी मतांची भावनिक बांधिलकी भाजप मिळवू पाहणार आहे. ्या

सहानुभूती रोखणार

राज ठाकरे आणि पर्यायी संपूर्ण मनसे भाजपच्या बाजून गेल्यास उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती भाजप रोखू पाहणार आहे. ही भाजपची जमेचीच बाजू असेल.

भाजपला शिवसेनेची साथ

आमदारांसह शिवसेनेला रामराम ठोकणाऱ्या एकनाथ शिंदेच्या गटाला येत्या काळात मनसेमध्ये विलिन केलं जाऊ शकतं किंवा मनसेच शिंदे गटाच्या शिवसेनेत सहभागी होऊ शकते. थोडक्यात भाजपला शिवसेनेची साथ अटळ.

समर्थन

राज ठाकरे यांच्या पाठीशी असणारा समर्थकवर्ग आणि त्यातूनही मराठी मतं विभागण्याऐवजी ती एकवटण्याकडे भाजपचा कल असेल आणि मनसेशी युती करत आता भाजप मतांना फुटणारे हे फाटे रोखू पाहत आहे.

महाराष्ट्रातील मराठी मतं

मुंबई आणि महाराष्ट्रातील मताधिक्य भाजपसाठी महत्त्वाचं असून इथं मोठ्या प्रमाणत समर्थन मिळवणाऱ्या पक्षांना त्याहूनही 'ठाकरें'ना आपल्या गटात घेऊन भाजप मोठा डाव खेळताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story