...म्हणून महाराष्ट्र अन् गुजरातनं अर्ध-अर्ध वाटून घेतलंय 'हे' रेल्वे स्टेशन; पाहा अनोखे Photos

Swapnil Ghangale
Apr 30,2025

अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा गुजरातमध्ये

भारतात एक असं रेल्वे स्थानक आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा गुजरातमध्ये आहे.

अनोख्या स्थानकाबद्दल जाणून घेऊयात

आजच्या महाराष्ट्र आणि गुजरात दिनानिमित्त याच अनोख्या स्थानकाबद्दल जाणून घेऊयात...

तिकीट महाराष्ट्रात, स्टेशन मास्तर गुजरातमध्ये

या रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकी महाराष्ट्रात आहे तर स्टेशन मास्तरची केबीन गुजरातमध्ये आहे.

चार भाषेत दिली जाते सूचना

या रेल्वे स्थानकावर एकूण चार भाषांमध्ये उद्घोषणा होते. हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी भाषेत सूचना केल्या जातात.

असं एकमेव रेल्वे स्थानक

देशातील हे एकमेव रेल्वे स्थानक आहे जे दोन राज्यांमध्ये वाटलं गेलं आहे.

स्थानकाचं नाव काय?

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अर्ध अर्ध वाटलं गेलेलं हे स्थानक आहे नवापूर रेल्वे स्थानक!

मोठा भाग गुजरातमध्ये...

नवापूर रेल्वे स्थानकाच्या पलाटाची एकूण लांबी 800 मीटर असून त्यापैकी 500 मीटर गुजरातमध्ये तर 300 मीटर महाराष्ट्रात आहे.

दोन जिल्ह्यात आहे हे स्थानक

या रेल्वे स्थानकाचा गुजरातमधील भाग हा तापी जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रातील भाग हा नंदुरबार जिल्ह्यात येतो.

का वाटलं गेलं हे स्थानक दोन राज्यांमध्ये?

नवापूर रेल्वे स्थानक उभारण्यात आलं तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्राचं विभाजन झालं नव्हतं. 1961 ला दोन राज्य तयार झाली आणि हे स्थानक दोन राज्यात वाटलं गेलं.

बाकडाही दोन राज्यांमध्ये

नवापूर रेल्वे स्थानकावरील एका बाकड्याचा अर्धा भाग गुजरात आणि अर्धा महाराष्ट्रात आहे. लोक या बाकड्यावर बसून फोटो काढतात.

कोणत्या मार्गावर येतं हे स्थानक?

या स्थानकावर एकूण तीन प्लॅटफॉर्म आणि चार रेल्वे लाईन आहेत. हे स्थानक जळगाव-सूरत मार्गावर आहे.

गुगल मॅपवर असं दिसतं हे स्थानक

गुगल मॅपवर हे नवापूर रेल्वे स्थानक असं दोन्ही राज्यांच्या सीमेवर दिसतं.

VIEW ALL

Read Next Story