Maharashtra Din 2025: महाराष्ट्र देशातील सर्वात श्रीमंत राज्य; UP, गुजरात कितव्या स्थानी? पाहा Top 10 List

Swapnil Ghangale
Apr 30,2025

देशातील सर्वात श्रीमंत राज्य

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला देशाची आर्थिक राजधानी मानलं जातं. महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.

इतर राज्य कितव्या स्थानी?

महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. मात्र श्रीमंत राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश, गुजरातसारख्या राज्यांबरोबरच इतर राज्यं कितव्या स्थानी आहेत?

देशातील सर्वात श्रीमंत 10 राज्यं कोणती आहेत?

चला तर 2024 मधील आकडेवारीनुसार फोर्ब्स, पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चमधून देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणती आहेत यासंदर्भातील माहिती समोर आली आहे ते पाहूयात...

महाराष्ट्राचा जीडीपी किती?

2024 मध्ये महाराष्ट्राचा जीएसडीपी 42.67 लाख कोटी रुपये इतका असून हा सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे.

देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचं योगदान किती?

देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचे योगदान 13.30 टक्के इतके आहे.

श्रीमंत राज्याच्या यादीत दुसऱ्या स्थानी...

तामिळनाडू हे देशातील दुसरे सर्वात श्रीमंत राज्य असून त्यांचा जीएसडीपी 31.55 लाख कोटी रुपये इतका असून देशाच्या एकूण जीडीपीच्या 8.90 टक्के इतकं आहे.

तिसरं सर्वात श्रीमंत राज्य कोणतं?

कर्नाटकचा जीएसडीपी 28.09 लाख कोटी रुपये इतका असून जीडीपीच्या प्रमाणात त्याची टक्केवारी 8.20 इतकी आहे. हे राज्य श्रीमंत राज्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

चौथ्या स्थानी आहे महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य

गुजरात हे राज्यातील चौथे सर्वात श्रीमंत राज्य असून या राज्याच्या जीएसडीपी 27.9 लाख कोटी रुपये इतका आहे. हे प्रमाण देशाच्या जीडीपीच्या 8.10 टक्के आहे.

पाचव्या स्थानी 'हे' राज्य

24.99 लाख कोटी रुपये जीएसडीपीसहीत श्रीमंत राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश पाचव्या स्थानी असून त्याचं देशाच्या जीडीपीतील योगदान 8.40 टक्के इतकं आहे.

सहाव्या आणि सातव्या स्थानी कोण?

सहाव्या स्थानी पश्चिम बंगाल असून त्यांचा जीएसडीपी 18.8 लाख कोटी रुपये इतका असून सातव्या स्थानी राजस्थानचा क्रमांक लागतो. राजस्थानचा जीएसडीपी 17.8 लाख कोटी रुपये इतका आहे.

टॉप दहामध्ये तळाची तीन राज्यं कोणती?

श्रीमंत राज्याच्या यादीत तेलंगण, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत. अव्वल 10 मध्ये बिहारचा समावेश नाही.

VIEW ALL

Read Next Story