दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.

2 जूनला दुपारी 1 वाजता

2 जून 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

14 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य

2 मार्च ते 25 मार्चदरम्यान दहावीची परीक्षा पार पडली आहे. 14 लाख विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते.

जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल

गेल्या अनेक वर्षांपासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जात आहे.

ऑनलाइन पाहू शकता निकाल

तुम्ही ऑनलाइन पद्धतीने काही वेबसाईट्सवर हा निकाल पाहू शकता. कोणत्या लिंकवर हा निकाल पाहू शकता हे जाणून घ्या.

mahahsscboard

बोर्डाची वेबसाईट mahahsscboard वर तुम्ही निकाल पाहू शकता.

mahahsscboard

mahahsscboard.in येथेही तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

mahresult.nic.in.

mahresult.nic.in. ही वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहण्यासाठी वापरु शकता. SSC result link वर येथे तुम्ही क्लिक करा.

sscresult.mkcl.org

sscresult.mkcl.org यावरही तुम्ही निकाल तपासू शकता.

कसा पाहायचा निकाल?

बेवसाईटवर गेल्यानंतर Maharashtra SSC 10th Result 2023 या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव टाकल्यानंतर निकाल पाहता येईल.

निकालाची प्रत ठेवा

हा निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता. त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.

VIEW ALL

Read Next Story