राज्यात कधीपासून भरणार हुडहूडी? थंडीचे दिवस राज्याच्या वेशीवर... तारीख पाहाच

Published by: Sayali Patil | Oct 28, 2025

अरबी समुद्र

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Published by: Sayali Patil | Oct 28, 2025

हिवाळा

मुळात ऑक्टोबर संपून नोव्हेंबर सुरु व्हायला आला तरीही थंडीचा थांगपत्ता नसल्यानं आता हिवाळा नेमका कधी सुरू होणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

Published by: Sayali Patil | Oct 28, 2025

गारठा

हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 5 नोव्हेंबरनंतर हा अवकाळी पाऊसही माघारी फिरून हळूहळू गारठा वाढेल आणि बहुप्रतिक्षित अशा थंडीची चाहूल लागेल.

Published by: Sayali Patil | Oct 28, 2025

मोंथा

सध्या महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा इथं 'मोंथा' चक्रीवादळाचा प्रभाव असल्या कारणानं पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

Published by: Sayali Patil | Oct 28, 2025

कमी दाबाचे क्षेत्र

गुरुवारी रात्री सुरतनजीकच हे कमी दाबाचे क्षेत्र धडकणार असून, त्याचा प्रभाव प्रचंड प्रमाणात दिसून येईल. ज्यामुळं या आठवडाअखेरीसही महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल.

Published by: Sayali Patil | Oct 28, 2025

हवामानाची स्थिती

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या अखेरीस मात्र हवामानाची ही स्थिती बदलणं अपेक्षित असून, 5 नोव्हेंबरपासून त्यासाठीची वातावरणनिर्मिती सुरु होईल.

Published by: Sayali Patil | Oct 28, 2025

थंडी वाढणार

तेव्हा आता उकाडा, अवकाळी निवळून हळूहळू राज्यात थंडी वाढणार असंच हवामान विभागाकडून सांगण्यात आल्यानं यंदा तापमानाचा निचांकी आकडा कुठं पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Published by: Sayali Patil | Oct 28, 2025

VIEW ALL

Read Next Story