भारत - पाकिस्तान यांच्यातील संबंध हे नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तान बऱ्याचदा भारतातील काही भागांवर आक्रमक करून तेथील जमीन मिळवण्याचा प्रयत्न करत असताना दिसतात. मात्र एकेकाळी मराठ्यांनी सध्या पाकिस्तानात असणाऱ्या काही किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकावला होता.

Pooja Pawar
Apr 30,2025


मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकावत सध्याचा पाकिस्तान, अफगाणिस्तान ते बलुचिस्तान पर्यंत मजल मारली होती.


1758 च्या मोहिमेत मराठ्यांनी पाकिस्तानातील काही प्रमुख किल्ले जिंकले होते. यावेळी मोहिमेचे नेतृत्व रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर, मानाजी पायगुडे, खंडुजी कदम, नेकाजी भोसले, साबाजी शिंदे यांनी केलं होतं.

कोहना किल्ला, मुलतान :

मुलतानमधील कोहना किल्ला हा 1200 वर्ष जुना असून त्याचा घेर जवळपास 2 किमी इतका आहे. या किल्ल्याला 46 बुरुज आणि 4 दरवाजे आहेत.

अटक किल्ला :

सिंधू नदीच्या काठावर असलेला अटक किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी 1758 मध्ये मोहीम केली होती. त्यावेळी मानाजी पायगुडे हे या मोहिमेत आघाडीवर होते.

जमरूद किल्ला, खैबरखिंड :

मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे इत्यादींच्या नेतृत्वात मराठ्यांनी खैबरखिंडीच्या पायथ्याला असलेला जमरूद किल्ला जिंकला होता.

शाही किल्ला, लाहोर :

10 एप्रिल 1758 मध्ये लाहोरचा शाही किल्ला जिंकण्यात मराठ्यांना यश आले होते. यावेळी या मोहिमेचे नेतृत्व वीर मानाजी पायगुडे यांनी केले होते.

रोहतास, झेलम :

झेलम शहरातील रोहतास किल्ल्यावर सुद्धा मराठ्यांनी भगवा झेंडा फडकावला होता. रोहतास किल्लावर 12 मोठे दरवाजे आणि 60 फूट उंचीचे 68 बुरुज आहेत.

बाला हिस्सार, पेशावर :

पेशावर मधील बाला हिस्सार किल्ला सुद्धा मराठयांनी जिंकला होता. अहमदशाह अब्दालीचा मुलगा तैमुरशाह दुर्राणी याने या किल्ल्याला बाला हिस्सार असं नाव दिलं होतं.

VIEW ALL

Read Next Story