Milk Benefits : लहान मुलांना नेहमी सांगितले जाते की, दूध प्यायल्याने तुम्ही स्ट्रॉग होता. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? शरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे ते?
दुधात सुकी द्राक्षे मिसळून प्यायल्यास शरीरातील कमजोरी दूर होते.
दूध आणि सुकी द्राक्षे देखील पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत
दुधात वेलची मिसळून प्यायल्याने पावसाळ्यातील आजार दूर होतात तसेच शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते.
बदाम टाकून दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील कमजोरी दूर होते.
दुधात केशर मिसळून ते प्यायल्यानेही शरीर निरोगी राहते.
केशर दूध बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
अश्वगंधा पावडर दुधासोबत घेतल्याने झोप न येण्याची समस्या दूर होते. दुधासोबत अश्वगंधा पावडर घेतल्याने शरीराची ताकद वाढते.