राज्यातील मासेमारी व्यवसाय ठप्प? ताटातून पापलेट, सुरमई गायब... किमती वधारल्या!

Published by: Sayali Patil | Oct 31, 2025

हवामान बदल

सततचे हवामान बदल आणि त्यामुळं समुद्रातील वाऱ्यापासून अगदी समुद्रातील पाण्यावर होणाऱ्या परिणामाचा थेट परिणाम मत्स्यव्यवसायावर आणि मत्स्यप्रेमींवरही झाला आहे.

Published by: Sayali Patil | Oct 31, 2025

वादळसदृश परिस्थिती

अरबी समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे मागील आठ दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे.

Published by: Sayali Patil | Oct 31, 2025

अजस्र लाटांचा मारा

वादळी वाऱ्यांमुळे आणि अजस्र लाटांचा सतत होणारा मारा पाहता मुंबई, कोकण आणि नजीकच्या किनारपट्टी भागांमध्ये मासेमारीच्या अनेक नौका बंदरातच आहेत.

Published by: Sayali Patil | Oct 31, 2025

मासळी

दुसरीकडे हिवाळ्याचे दिवस नजीक असल्यानंसुद्धा मासळी समुद्राच्या तळाशी जाम्यास सुरुवात झाल्यानं मस्त्यव्यवसायावर याचा परिणाम झाला आहे.

Published by: Sayali Patil | Oct 31, 2025

सरंगा, मोडोसा

बांगडा 150 वरून 300 रुपयांना विकला जात आहे. कोळंबी, सरंगा, मोडोसाचे दर 25 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत.

Published by: Sayali Patil | Oct 31, 2025

सुरमई

सध्या मासळी बाजारात सुरमईचा दर 500 रुपयांवरून थेट 800 ते 1200 रुपये किलोवर गेला आहे. तर, पापलेट 700 वरून दीड हजारांपर्यंत पोहचलं आहे.

Published by: Sayali Patil | Oct 31, 2025

माशांचे दर

खवैय्यांच्या आवडीच्या माशांचे दर वधारले असून, त्यामुळं आता आवडीचं जेवण करायचं तरी कसं हा प्रश्नसुद्धा अनेकांपुढं उभा राहिला आहे.

Published by: Sayali Patil | Oct 31, 2025

VIEW ALL

Read Next Story