पावसाळ्यात अनेकजण कुटुंब आणि मित्रांसोबत ट्रिपचा प्लॅन करतात.
मुंबईपासून 93 किलोमीटर लांब असलेल्या लोणावळा येथे अशी काही ठिकाण आहेत ज्याला तुम्ही पावसाळ्यात नक्की भेट देऊ शकता.
लोणावळा हे हिल स्टेशन पावसाळ्यात भेट देण्यासाठी परफेक्ट स्पॉट आहे. येथील नैसर्गिक सौंदर्याने अनेकांना आकर्षित करते.
लोणावळ्यात वॅक्स म्युझियम असून येथे विराट कोहली, ए.आर. रहमान, राजीव गांधी, अमिताभ बच्चन, कपिल देव, इत्यादी अनेक दिग्गज व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. तुम्ही या पुतळ्यांसोबत फोटो सुद्धा काढू शकता.
कार्ला लेणी ही लोणावळा येथील प्रसिद्ध लेणी असून ही याजवळ एकविरा देवीचे प्रसिद्ध मंदिर सुद्धा आहे.
पावसाळ्यात धबधब्यांमध्ये भिजण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. बुशी धरणाजवळील कुणे धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.
कार्ला लेणीजवळ सुद्धा एक धबधबा वाहतो. अनेकजण येथे फोटो शूट करण्यासाठी येतात.