महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्याने शहरांसह ग्रामीण भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडत आहे.
पावसाळ्यात अनेकजण 1 डे पिकनिकचा प्लान करतात. तेव्हा ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी एक असणाऱ्या डोंबिवलीजवळ असलेल्या काही अफलातून धबधब्यांविषयी जाणून घेऊयात.
भिवपुरी धबधबा हा डोंबिवलीहून अवघ्या 45 किलोमीटरवर असून याठिकाणी तुम्ही प्रायव्हेट कार किंवा ट्रेनने जाऊ शकता.
पांडवकडा धबधबा हा डोंबिवलीहून अवघ्या 23 किलोमीटरवर आहे. पांडवकडा धबधबा हा पावसाळ्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
पालसदरी धबधबा हा सुद्धा मुंबई जवळील एक सुंदर पर्यटन स्थळ असून हा धबधबा डोंबिवलीहून जवळपास 58 किलोमीटर दूर आहे.
देवकुंड धबधब्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.