सातारा आणि थंडी...

महाबळेश्वरमध्ये तापमान 10 अंशांवर; आताच बॅग उचलून निघा आणि पाहा इथली कमी गर्दीची ठिकाणं. महाबळेश्वरमध्ये आता पर्यटकांची रेलचेल वाढली असून, तेयेथील गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. सध्या स्वेटर, कानटोपी, शाली परिधान करून मुख्य बाजारपेठेमध्ये पर्यटक फेरफटका मारताना दिसत आहेत.

Nov 24,2023

महाबळेश्वर

अशा या गिरीस्थानावर भटकंतीसाठी आलं असता त्याचत्याच गर्दीच्या ठिकाणी भेट देण्यापेक्षा यावेळी काही नव्या ठिकाणांना भेट द्या आणि नव्यानं महाबळेश्वर आणि सातारा भाग अनुभवा.

धोम धरण आणि परिसर

पाचगणीतून दर्शनी असणारं धोम धरण वाईमध्ये अर्थात महाबळेश्वरच्या पायथ्याशी असून, इथंही तुम्ही बराच काळ व्यतीत करू शकता.

शांतता

धरणाला लागून असणारी गावं, तिथं असणारे रिसॉर्ट आणि शांतता तुम्हाला खुणावत असते.

टेबल टॉप लँड

एखाद्या टुमदार गावात आल्याची जाणीव पाचगणीमध्ये होते. इथं असणाऱ्या टेबल टॉप लँडवरून तुम्ही छानसा सूर्यास्त अनुभवू शकता.

कृष्णाबाई मंदिर

महाबळेश्वरमध्ये असणारं कृष्णाबाई शिवमंदिर फारच कलात्मक असून, त्याला मोठा इतिहास आहे. लाल मातीवर काळ्या खडकामध्ये कोरीवकाम करून उभारण्यात आलेलं हे मंदिर पाहताना आपण कायमच थक्क होतो.

ख्रिस्ट चर्च

महाबळेश्वरमधील ख्रिस्ट चर्च म्हणजे एखाद्या हॉलिवूडपटातील एक दृश्यच. महाबळेश्वरचे तेव्हाचे गव्हर्नर सर जॉन मॅकॉलम यांनी ये चर्च उभारलं. चर्च ऑन हिल अशी त्याची ओळख.

तापोळा

महाबळेश्वरपासून थोडं पुढं आलं असता तुम्हाला राज्यातील मिनी काश्मीर अर्थात तापोळ्याला भेट देता येते. इथं तुलनेनं प्रवाशांची गर्दी कमी असल्यामुळं निसर्ग अधिक जवळून अनुभवता येतो.

VIEW ALL

Read Next Story