महाराष्ट्रात गिरीस्थानांची अर्थात हिल स्टेशनची कमतरता नसली तरीही काही ठिकाणं मात्र आजही मुख्य प्रवाहात नाहीत.
कोल्हापूरात असणारं एक हिलस्टेशनही याच यादीत येतं. कारण, मोजकी ठिकाणं वगळता एक गिरीस्थान म्हणून त्याकडे पाहणारे तसे कमीच.
कोल्हापूरपासून अवघ्या 21 किमी अंतरावर असणारं हे ठिकाण म्हणजे पन्हाळा हिलस्टेशन. कोल्हापूरमध्ये असताना अगदी गप्पा संपायच्या आत तुम्ही इथं पोहोचू शकता.
समुद्रसपाटीपासून साधारण 3200 फूट उंचीवर असणाऱ्या या पन्हाळा हिलस्टेशनवर पाहण्याजोगी अनेक ठिकाणं असून इथला निसर्ग भुरळ पाडणार आहे.
डोंगर आणि घाटवाटांमधून इथं पोहोचताना हवेतील गारवा मन सुखावून जातो. तर, इथं पसरणाची धुक्याची दुलई स्वर्गानुभव देऊन जाते.
पर्यटनाच्या दृष्टीकोनातून कोल्हापूरातील हे ठिकाण सुविधांनी बऱ्यापैकी परिपूर्ण असून, इथं सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये पन्हाळा गिरीस्थान तितक्याच वेगळ्या रुपांमध्ये येणाऱ्यांच्या स्वागतास सज्ज असतं. काय मग, तुम्ही कधी इथं जाण्याचा बेत आखताय?