Pune News: भुशी डॅम ओव्हर फ्लो; वीकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी!

Published by: Zee Team | Jul 23, 2023

पावसाळ्यात वीकेंड डेस्टिनेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आल्हाददायक वातावरण तयार झालंय.

Published by: Zee Team | Jul 23, 2023

संपूर्ण मावळ तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मावळच्या सौंदर्यात भर पडलीये.

Published by: Zee Team | Jul 23, 2023

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात देखील आल्हाददायक वातावरण तयार झालंय. त्यामुळे पर्यटकांना लोणावळा आता आकर्षित करू लागला आहे.

Published by: Zee Team | Jul 23, 2023

अनेक पर्यटक लोणावळ्यात वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी आता गर्दी करू लागले आहेत. पावसाचा जोर वाढल्याने भुशी धरणाच्या पायऱ्यावरून पाण्याचा वेग वाढलाय.

Published by: Zee Team | Jul 23, 2023

पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद पर्यटकांना घेता येत नसला तरी बाजूला येऊन पर्यटक आनंद घेत आहेत.

Published by: Zee Team | Jul 23, 2023

VIEW ALL

Read Next Story