Ganpati Special Train Updates: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच आता कोकणात जाण्यासाठीच्या विविध मार्ग आणि पर्यायांची चाचपणी अनेकांनी सुरू केली आहे.
यामध्ये फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेच नव्हे, तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पुणेकरांसाठीसुद्धा रेल्वे विभागानं विशेष सुविधा केल्या आहेत.
पुण्यातून रेल्वेमार्गानं कोकण गाठू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण, पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-रत्नागिरी मार्गावर विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत.
विशेष श्रेणीतील या 12 रेल्वेगाड्यांचं आरक्षण 24 जुलैपासून सुरू झालं असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष गाड्यांमध्ये सहा साप्ताहिक विशेष रेल्वे आणि सहा वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वे फेऱ्यांचा समावेश आहे.
या रेल्वे 23,30 ऑगस्ट, 2, 6 आणि 9 सप्टेंबर रोजी धावतील. पुण्याहून रात्री 12.25 वाजता सुटणाऱ्या या गाड्या सकाळी रत्नागिरीत पोहोचतील, तर परतीच्या गाड्या संध्याकाळी 5.50 वाजता रत्नागिरीहून सुटतील.
गणेशोत्सवानिमित्त सोडण्यात येणाऱ्या या गाड्यांना चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, चिपळूण, संगमेश्वर यांसारख्या 15 स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे