अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांची नेहमीच चर्चा असते. महाराष्ट्रातील सर्वात ग्लॅमरस सरपंच म्हणून त्या ओळखल्या जातात.

वनिता कांबळे
Jun 10,2025


निर्मला नवले या महाराष्ट्रातील सर्वात ग्लॅमरस महिला सरपंच आहेत. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 514K followers आहेत.


निर्मला नवले यांचे लाईफस्टाईल, त्यांचे राहणीमान यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.


राजकारणात त्यांना त्याचे पती शुभम नवले यांची देखील पदोपदी साथ मिळाल्याचे त्या सांगतात.


निर्मला नवले यांची लोकप्रियता पाहूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे पद दिले आहे.


निर्मला नवले यांनी वट पौर्णिमा साजरी केली. या निमित्ताने त्यांनी खास फोटोशूट केले.


“वटपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त, आपली नाती वटवृक्षाप्रमाणे बळकट व्हावी, अशी प्रार्थना!”, असं कॅप्शन देत त्यांनी सोशल मिडियार वट पौर्णिमेचे फोटो शेअर केले आहेत.


निर्मला नवले यांनी पारंपारिक पद्धतीने वडाची पूजा केली.


निर्मला नवले या आयटी इंजिनीयर आहेत. त्यांना समाजकार्याची आवड आहे. सरपंच म्हणून अनेकदा त्यांनी कारेगाव ग्रामपंच्यातीचे व्हिजन मांडले.

VIEW ALL

Read Next Story